Friday, August 17, 2007

व्यथा एका मनाची

काय चाललय मनात काही कळेना. काहीच कसे जमेना. सर्वच कस चुकीच होतय. काय चांगल काय वाईट काही फरकच कळत नाहीय. का अस व्हाव की नेहमी आवडणारी गाणी ऐकावीशी न वाटावी. का मला आजकाल छोट्या छोट्या गोष्टींनी एवढा राग यावा कींवा irritate व्हाव. का अस व्हाव की मी मनातून खचलेला, पण बाहेर मात्र सगळ्यांशी काहीच न घडल्यासारखा हसत खेळत बोलणारा, अगदीच काही न घडल्यासारखा निर्विकार चेहरा करुन नेहमीप्रमाणे काम करत राहिलेला. मला जेव्हा वाटत की मी खचून गेलोय तेव्हा मी स्वत:ला फसवतोय की मी जेव्हा सगळ नेहमीप्रमाणे चालू ठेवलय तो एक दिखावा आहे. काय खर आणि काय खोट? मी अत्यंत चांगला की अतिमूर्ख? छ्या! कसे ओळखावे. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाहि? विश्वास ठेवला तर त्यांनी फसवण्याची भीती वाटते, नाही ठेवला तर एकट्याच्या बळावर कीती अडथळे पार करणार?
सगळे philosophers म्हणतात की विचारांवर control ठेवा, पण आजुबाजूला काही चांगल दिसतच नसेल तर चांगले विचार आणायचे कुठुन?
अस वाटत कुठेतरी दूर पळून जाव काही दिवसांसाठी. फक्त शांतपणे बसून रहाव, एका शांर, निसर्गसुंदर ठिकाणी. डोक्यात काही विचार असू नये. सगळे विष डोक्यातून काढुन टाकावे. मग परत येउन नवीन उत्साहाने, नव्या दमाने एक नवीन जीवन सुरु करावे.