Thursday, May 04, 2006

'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' हे मनात ठेवून एकदम जोशात मी ब्लॉग लिहायला सुरवात केली पण आता ब्लॉग लिहित राहणे मात्र कठीण हो़उन बसले आहे. प्रेरणा मिळावी म्हणून marathiblogs.net वरुन काहि ब्लॉग्स follow केले आणि त्या ब्लॉग्सचे अतिशय चांगले लिखाण बघून गारच पडलो. प्रेरणा मिळ्णे तर दूरच, असे वाटायला लागले कि लायकी आहे का माझी लेखनाची. आरंभशूरपणा तर दाखवला, आता लिहा. नंतर वाटले कि हा माझा ब्लॉग आहे, जो मी माझ्या समाधानासाठी सुरु केला, मग मी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार का करावा, कधीतरी मी हि चांगला लेखक बनेल.
प्रेरणा, भावना, कल्पना अशा सगळ्या येतील कधीनकधी माझ्याकडे (काय विचार करताय? मुलींबद्दल नाही बोलतय मी, तशा आल्यातर वाईट नाहि वाटणार मला). त्या आल्याकि कसा झकास ब्लॉग लिहिन मी.
सोडा, नाहि तो हातातला कप नका सोडू, सध्या हा ब्लॉग वाचण सोडा आणि जोपर्यंत मी कल्पना, भावना, प्रेरणा यांना जमवून नवीन ब्लॉग लिहतो तोपर्यंत दुसरा एखादा झकास मराठी ब्लॉग वाचा.

2 comments:

शैलेश श. खांडेकर said...

अहो, तुम्ही मनमोकळे लिहा. पाण्यात उडी घेतली की पोहणे शिकता शिकता माणूस पट्टीचा पोहणारा होतो.

http://vidagdha.wordpress.com/2006/01/27/anudohi/

शुभेच्छा!

nikone said...

धन्यवाद. लिह्ण्याचे प्रयत्न तर सुरु ठेवीनच.