Monday, June 19, 2006

ह... एकंदर कार्यालयातील वातावरण बघून वाटतय की पुढचा आठवडा फारच धावपळीत जाणार. नाही म्हणजे जरी मी IT companyत कामाला असलो तरी जास्त काम म्हंटल की कपाळाला आठ्या या पडतातच. नोकरी लागली की कस जग थांबूनच जात. Collegeमध्ये असतांना कोणी मित्राने फोन केला की बोलायला हजार गोष्टी असायच्या, आता कोणी विचारल 'क्या चल रहा है?" तर माझ आपल standard उत्तर तयार असत, "कुछ नही यार, बस अपना routine job चल रहा है।" शैक्षणिक आयुष्यात जो उत्साह असतो तो एकदा नोकरी चालू झाल्यावर कसा संपूनच जातो. नाहि म्हणायला नोकरीमध्ये पण शिकण्यासारख फार काही असत पण त्या शिकण्यात तशी फारशी मजा येत नाही, अर्थात अस सगळ्यांच्याच बाबतीत होत नसाव. हे माझ्या मनात आल ते म्हणजे आजकाल माझ्या मित्रांचे माझ्याबरोबर जे संवाद होतात त्यामुळे. तो पहिलेचा सहजपणा कसा तो उरलाच नाहीय. बहुतेक संवाद काम, पैसा, career आणि लग्न (वयाचा दोष) या चार गोष्टींभवतीच फिरत राहतात. लग्न हा विषय तसा नुकताच काही महिन्यांपूर्वी आमच्या संवादामध्ये यायला लागला; सर्वथा नवीन हो‍उ घातलेल्या नवरेमंडळींमुळे. सर्वच संवाद तसे गंभीर नसतात; कार्यालयातील निरनिराळ्या मजा, एकाकाचे कार्यालयातील कारनामे ऐकण्याजोगे असतात. आयुष्य कधी आणि कस बदलत हे लक्षात येत नाही. शाळेत असतांना किंवा college मध्ये असतांना अस सतत वाटत रहायच की आयुष्यात काहीतरी नवीन होतय. याउलट गेल्या एक वर्षापासून अस वाटतय की आयुष्य एकाच ठिकाणी थांबलय आणि पुढे सरकायला तयारच नाहीय. सुट्टीच महत्व शाळेपेक्षा नोकरीत जास्त कळत. अल्बर्ट आइनस्टाइनचा एक सुंदर quote आहे, “Life is like riding a bicycle, to keep it balanced you need to keep moving.” आणि माझ्या cycleचा balance जायला लागलाय.
चला जाउद्या थोड काम करायला पाहिजे नाहितर आमची cycle चालणार कशी?

4 comments:

Vishal K said...

निखिल,
(तुझ्या ब्लॉगवरच कुठेतरी हे तुझं नाव वाचल्याचं आठवतंय.) तुझा ब्लॉग वाचला.. छान लिहीतोस. असंच लिहीत राहा. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

शैलेश श. खांडेकर said...

विशालशी सहमत. सुंदर लेख.

Nandan said...

lekh aavaDala. PoorNapaNe tyachyashi identify karoo shakalo.

nikone said...

विशाल, शैलेश व नंदन तुम्हा तिघांचेही धन्यवाद.